प्रवेश सूचना (शैक्षणिक वर्ष २०२५-२६)
प्रवेश सूचना (शैक्षणिक वर्ष २०२५-२६)
विषय: प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत.
सर्व विद्यार्थी आणि पालकांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता खालील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक १६ जून २०२५ पासून सुरू होत आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम (प्रथम वर्ष):
- बी.ए. (B.A.)
- बी.कॉम. (B.Com.)
- बी.एस्सी. (B.Sc.)
प्रवेशासाठी महत्त्वाच्या सूचना:
- प्रवेश प्रक्रिया ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियमांनुसार ऑनलाईन पद्धतीने होईल.
- प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेत दिलेली आहे किंवा कार्यालयात संपर्क साधून मिळवता येईल.
- इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००) संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी, कृपया महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
धन्यवाद!
प्राचार्य,
